Navratri 2024: नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शानासाठी जाताय? मग मुंबईतील "या" देवीला नक्की भेट द्या...

Navratri 2024: नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शानासाठी जाताय? मग मुंबईतील "या" देवीला नक्की भेट द्या...

नवरात्रीमध्ये मुंबईच्या काही देवीबद्दल फार बोललं जातं अशाच मुंबईच्या काही नावागाजात असलेल्या देवींना नवरात्रीच्या नऊ रात्रीत भेट देऊ शकता, जाणून घ्या...
Published by :
Team Lokshahi
Published on

नवरात्री अवघ्या काही दिवससांवर येऊन ठेपली आहे अनेक मंडळामध्ये तयारी देखील सुरु झाली आहे. दुर्गेच्या महिमेवर अनेक कथा आपण ऐकूण असाल देवीने नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध करून अखेर दहाव्या दिवशी त्याच्या वध केला जो दिवस हिंदू धर्मात दसरा म्हणून ओळखला जातो. तर देवीला अनेक नावांनी ओळखले जाते महिषासुरमर्धिनी, दहिषासुरमर्धिनी, करवीरपुरवासिनी तसेच दुर्गा अशा अनेक नावात देवी दुर्गेची व्याप्ती आहे. देवीची नावे आणि रुपे जरी अनेक असली तरी ती एकाच रुपाची अनेक रुपे आहेत. नवरात्रीमध्ये मुंबईच्या काही देवीबद्दल फार बोललं जातं अशाच मुंबईच्या काही नावागाजात असलेल्या देवींना नवरात्रीच्या नऊ रात्रीत भेट देऊ शकता, जाणून घ्या...

जपाची देवी
मुंबईतील करीरोड येथील फ्लायओवर गुंदेचा गार्डन परेल येथे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आहे. येथे विराजमान होणाऱ्या देवीला जपाची देवी म्हणून ओळखले जाते. या देवीची स्थापना तेथिल लोकांनी १९५१ ला केली होती. या ठिकाणी नवरात्रीत मोठा जल्लोष पाहायला मिळतो तसेच येथे मोठ्या गर्दीने भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. या नवरात्रीला करीरोड येथील जपाच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही सुद्धा जाऊ शकता.

बकरी अड्डयाची देवी

बकरीअड्डडा याठिकाणी आहे. या देवीची स्थापना १९४६ मध्ये झाली असून याठिकाणी नवरात्रीनिमित्त महिला साठी विशेष मंगळागौर कार्यक्रम, दसरा संमेलन, पत नाट्य इत्यादी अनेक कार्यक्रम पाहायला मिळतात. त्यामुळे नवरात्रोत्सवात या देवीला तुम्ही नक्की भेट द्या.

चिंचपोकळीची आईभवानी

चिंचपोकळीच्या चिंतामणी प्रमाणेच चिंचपोकळीची आईभवानी देखील तितक्याच नावागाजात ओळखली जाते. यावर्षी चिंचपोकळीची आईभवानीचे हे 72 वर्ष आहे. या देवीच्या दर्शनाला अनेक मोठे मोठे कलाकार देखील उपस्थिती लावताना दिसून येतात.

दगडी चाळीची आईमाऊली

डॅडी म्हणून ओळखले जाणाऱ्या अरुण गवळी यांच्या दगडी चाळीच्या आईमाऊलीचा स्थापना १९७३ मध्ये झाली. ही देवी BMC चौक नाना नानी पार्क रोहिदास गार्डन बापूराव जगताप मार्ग भायखळा याठिकाणी विराजमान होते. याठिकाणी नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात पाहायला मिळतो. खुप प्रसिद्ध अश्या या दगडी चाळच्या आईमाऊलीचे दर्शन तुम्ही नवरात्रीमध्ये घेऊ शकता.

आग्रीपाड्याची महालक्ष्मी

भायखळा येथेच दगडी चाळच्याच देवीच्या ठिकाणी बाजूला आग्रीपाड्याची देवी विराजमान होते. या देवीला आग्रीपाड्याची महालक्ष्मी देखील बोलले जाते. या देवीची स्थापना १९७५ मध्ये झाली आहे.

खेतवाडीची आई

खेतवाडीची देवी ही तिच्या उंच मुर्तीसाठी प्रसिद्ध आहे. या देवीचा मुर्ती आकर्षक आणि 32 फुट उंच अशी या देवीची मुर्ती 2वी, KVN क्रॉस Ln, ग्रँट रोड पूर्व, खेतवाडी, गिरगाव, मुंबई याठिकाणी विराजमान होते. मुंबईतील सर्वात लोकप्रिय अशा या देवीला पाहण्यासाठी ठिकठिकाणाहुन लोक दर्शनासाठी येतात.

ठाण्याची दुर्गे दुर्गे‌‌श्वरी

मुंबईसह ठाण्याची देवी देखील जगभरात प्रसिद्ध असलेली ठाण्याची दुर्गे दुर्गे‌‌श्वरी म्हणून ओळखली जाते. ठाण्यातील टेंभी नाका याठिकाणी देवी विराजमान होते. १९७८ आनंद दिघे यांनी या देवीची स्थापना केली आहे. तर लालबागच्या राजाच दर्शनाप्रमाणेच टेंभी नाक्याच्या दुर्गे दुर्गे‌‌श्वरीच्या दर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी जमलेली असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com